प्रति, माननीय संपादकजी,
रामधाम येथे आदर्श सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात २५ जोडप्यांचे शुभमंगल.
जबलपूर महामार्गावरील असलेल्या मनसर येथील प्रख्यात रामधाम येथे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ ला चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम, मनसर तथा आधार बहुउद्देशीय संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला.यावेळी तब्बल २५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. विशेष म्हणजे रामधाम येथे गेल्या अनेक वर्षांपासून पार पडलेल्या आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत १३३९ जोडप्यांचे शुभमंगल निःशुल्क संपन्न झालेले आहे आणि यंदा त्यात २५ जोडप्यांची भर पडली.ज्यांची लग्न करायची सोय नाही अशा अनेक जोडप्यांचे येथे पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे रामधाम येथे निःशुल्क विवाह आटवून देतात. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये राज्यमंत्री आशीष जयस्वाल, माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे,संध्या चौकसे, सतीश डोंगरे, गौरव चौकसे, डीवायएसपी रमेश बरकते, ऋषिकेश किंमतकर, डॉ.अभिविलास नखाते, चंद्रशेखर आरगुलवार, डॉ राजेश ठाकरे,पत्रकार रमेश लांजेवार, नरेंद्र धुवारे, सुरेश समर्थ,संजय पवार,शाम गायकवाड इत्यादींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.या संपूर्ण मान्यवरांनी आयोजनविषयी गौरवोद्गार काढले व अशा सोहळ्याची समाजाला नितांत गरज असल्याचे स्पष्ट केले.यानंतर संपूर्ण मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स़ंचालन अनिल वाघमारे यांनी केले.
-रमेश लांजेवार
