Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादताडहदगाव येथे प.पू. रामानंद स्वामी सरस्वती (तुकाबाबा) यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा...

ताडहदगाव येथे प.पू. रामानंद स्वामी सरस्वती (तुकाबाबा) यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा होणार

ताडहदगाव येथे प.पू. रामानंद स्वामी सरस्वती (तुकाबाबा) यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा होणार

विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; ३ फेब्रुवारीला महाप्रसादाने सांगता

जालना/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त संस्थान ताडहदगाव येथे महान तपस्वी संत श्री प.पू. १०८ सद्गुरू रामानंद स्वामी सरस्वती (तुकाबाबा) यांचा भव्य ३४ वा पुण्यतिथी सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ ते मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन धार्मिक कार्यक्रम

सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • पहाटे ४ ते ६: काकडा भजन

  • सकाळी ६ ते ७: विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र पठण

  • सकाळी ७ ते १०: ज्ञानेश्वरी पारायण

  • दुपारी २:३० ते ५:३०: संगीत महाशिवपुराण कथा (वक्ते: श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज)

  • सायंकाळी ६ ते ७: हरिपाठ

  • रात्री ९ ते ११: भव्य हरिकीर्तन

कीर्तन सोहळा: नामांकित कीर्तनकारांची उपस्थिती

या सप्ताहात दररोज रात्री महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची सेवा होणार आहे: १. २७ जानेवारी: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख (पंढरपूर) २. २८ जानेवारी: ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे (आळंदी देवाची) ३. २९ जानेवारी: ह.भ.प. तुकाराम महाराज खडपे (परतूरकर) ४. ३० जानेवारी: ह.भ.प. विश्वंभर महाराज माळोदे (आष्टी) ५. ३१ जानेवारी: ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण) ६. १ फेब्रुवारी: ह.भ.प. जगदीश महाराज जोशी (त्र्यंबकेश्वर) ७. २ फेब्रुवारी: ह.भ.प. एकनाथ महाराज चतर (घाटकोपर)

काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद

मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी दिनानिमित्त सकाळी ७ वाजता गावातून श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत मठाधिपती ब्र. आत्मानंद शास्त्री महाराज यांच्या रसाळ वाणीतून ‘काल्याचे कीर्तन’ संपन्न होईल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या मंगलमय सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मठाधिपती श्री ब्र. आत्मानंद महाराज शास्त्री व श्री क्षेत्र दत्त संस्थान ताडहदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments