राखीच्या खरेदीसाठी बहिणींची मोठी गर्दी
जालना शहरातील बाजारपेठ उत्साहात न्हाल्या रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, जालना शहरातील राखी मार्केटमध्ये खरेदीसाठी बहिणींची मोठी गर्दी दिसून येत आहे. विविध रंगीबेरंगी, आकर्षक डिझाईनच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या असून, बहिणी आपल्या भावासाठी राखी खरेदी करताना उत्साहात दिसत आहेत. महाकाल, श्रीराम, छोटा भीम, स्पायडरमॅन अशा विविध थीमवरीbhulल राख्यांना यंदा विशेष मागणी असून, बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानदारही खरेदीदारांच्या गर्दीमुळे समाधानी असून, सणाला लागणाऱ्या अन्य वस्तूंचीही जोरदार खरेदी सुरू आहे. छायाचित्र किरण खानापुरे
