राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न
आत्ताच एक्सप्रेस 
 धारूर/प्रतिनीधी/येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्याना महाविद्यालयाची ओळख व्हावी, ग्रंथालय, सांस्कृतीक विभाग, क्रीडा, अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती, शिक्षणातील लवचिकता, समजावी या उद्देशाने आयोजीत कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्याना स्वत:ची ओळख व महाविद्यायामध्ये करत असलेल्या इतर विभागांची माहिती प्राध्यापकांनी विद्यार्थ्याना सांगीतली. त्यानंतर विद्यार्थ्याना ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ, अभ्यासक्रमाची पुस्तके, कोश, नियतकालिके, वर्तमानपत्रे, ई-संसाधने, क्यू-आर कोड प्रणाली यांची माहिती उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी दिली. क्रीडा विभागाचे बॅडमिंटन कोर्ट, जीम, कबड्डी मैदान, चेस यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी GE जेनेरिक ईलेक्टिव या विषयाची माहिती दिली तसेच परिक्षेचे स्वरूप लेखी व अंतर्गत मुल्यमापन कसे आहे हे सविस्तर सांगितले. उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, प्रो. डॉ. अशोक लाखे, डॉ. स्मिता बसोले, डॉ. एल. बी. जाधवर, प्रो. डॉ. बालाजी नवले, डॉ. डी. बी. जाधव, प्रा. नागोराव वाघमारे यांनी एनईपी 2020 संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा पुरेपूर उपयोग करावा. आपल्या आवडीच्या कलागुणांना विकसित करण्याचे कार्य महाविद्यालयात घडते. यामध्ये निपुण होऊन आपले व्यक्तिमत्व घडवावे व जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर महाविद्यालयातील एनईपी समन्वयक डॉ. स्मिता बसोले, इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक डॉ. इंद्रजित भगत यांबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकिय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी केले.