ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करा.अॅड राजेश भैय्या शिंदे
केज/प्रतिनिधी/ केज तालुक्यातील होळ व बनसारोळा महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तसेच संपूर्ण पीकविमा लागु करण्यात यावा अशी मागणी मा. तहसीलदार साहेब,केज यांच्याकडे केली तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला तरी साहेबांनी यावर लवकरात लवकर शक्य ती मदत शेतकर्यांना करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी युवानेते मा. संग्राम (भैय्या) शिंदे, ॲड. राजेश शिंदे, सुनील (बापू) देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.