Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्री नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे पदभार स्विकारला 

फुलंब्री नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे पदभार स्विकारला 

फुलंब्री नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे पदभार स्विकारला 
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंबी नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व नगरसेवक यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात काल दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी संपत्र झाला.
 फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ने नगराध्यक्षासह १२ नगरसेवक विजयी झाले  या सर्व नगरसेवकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ करपे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष मेटे, जिल्हा दूध संघाचे संचालक संदीप
बोरसे, सुदाम मते, सुभाष गायकवाड, जेष्ठ नेते अश्फाक पटेल, हाजी अजगर पटेल, रामराम देवमाळी, मोबीन शहा, सय्यद अझहर, राजू प्रधान आदीची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे म्हणाले की, ही निवडणूक सर्व जाती धर्मापलीकडची होती. प्रत्येक माणसाने स्वतः ची निवडणूक म्हणून काम केले तेव्हा आजचा हा दिवस उजाडला असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच वर्षाच्या काळात प्रत्येक क्षण हा शहराच्या विकासासाठी दिला जाईल निवडणूकी
दरम्यान मतदारांना दिलेले आश्वासन हे सत्यात आणल्या जातील त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी मी एखाद्या कार्यक्रमास आलो नाही म्हणून निराश व्हायचं नाही कारण तुम्हीच मला शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसविले त्यामुळे तुमच्या मताचा पुर्ण सन्मान राखला जाईल. नवनिर्वाचित नगरसेवकांनी आता सेवक म्हणून काम करायचे आहे जमिनीवर राहून काम करायचे आहे सर्व समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन पुन्हा मतदार आपल्यावर विश्वास टाकतील अशा प्रकारे प्रत्येक वार्डात काम करावे असे आवाहन ठोंबरे यांनी यावेळी केले यावेळी अश्फाक पटेल, मुफ्ती, रज्जाक हाफीस, पवन घोडके अझहर सय्यद, रामराव ,देवमाळी, अजगर पटेल मोबीन शहा आदींनी आपले विचार मांडते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र सिमंत यांनी तर आभार अभिजित घोडके यांनी मानते या पद‌ग्रहण समारंभासाठी फुलंब्री शहरातील हजारो नागरीकांची जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर उपस्थिती होती. यावेळी मनोज कपुर, काशिनाथ मिसाळ, धनंजय सिमत मुदसर पटेल, जावेद शहा, जमीर पठाण, मुन्तोजीब काजी, शरफोद्दीन काजी, संजय वाळके, विठ्ठलराव लुटे, विष्णू ठोंबरे, सांडू हापत, राजेंद्र नागरे, मधुकर सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, कदीर पठाण,  वंदना राजेंद्र ठोंबरे, अर्चना उमेश दुतोंडे, हिना मुदसर पटेल, सुशमेश प्रधान, आदिंसह हजारों नागरीकांची उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments