Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादआंबेडकरी मिशनच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायच्या लढाईत सहभागी व्हावे -...

आंबेडकरी मिशनच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायच्या लढाईत सहभागी व्हावे – राजेंद्र पाल गौतम

आंबेडकरी मिशनच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायच्या लढाईत सहभागी व्हावे – राजेंद्र पाल गौतम

 

नागपूर/ विदर्भ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आंबेडकरी मिशनचे नागपूर दिक्षाभूमी हे उगमस्थान आहे. म्हणून विदर्भात असलेल्या आंबेडकरी मिशनच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करतांना देशातील तमाम उपेक्षित, वंचित, ओबीसी, दलित व आदिवासी जनतेचा लढा केवळ राहुल गांधीच लढत आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांशी बोलतांनी केले. यावेळी मंचावरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे अनुसूचित जाती विभाग, बैठकीचे मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश लाडे, आमदार संजय मेश्राम, राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र करवाडे, अनिल नगरारे इत्यादींची उपस्थिती होती.

 

यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना राजेंद्र पाल गौतम यांनी सम्राट अशोकाचा भारत ते बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर व आंबेडकर मिशन पर्यंतचा सर्व इतिहास उलगडला. मी सत्तेसाठी किंवा पदासाठी राजकारणात नसून आंबेडकरी चळवळ व बहुजन समाजाचे आंदोलन यासाठीच माझे समर्पण आहे आणि याकरिता कुठल्याही त्यागाची माझी तयारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेस पक्षामध्ये आंबेडकराईट कार्यकर्त्यांना सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे त्यांचे प्रश्न काँग्रेस पक्षाने लावून धरले पाहिजेत यासाठी आपण सतत राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा करत आहोत काम करत आहोत. देशात अनुसूचित जाती व बहुजन समाजाचे प्रश्न असंख्य उभे आहेत वोट चोरीच्या प्रश्नापासून भाजप वरती त्यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली. सामाजिक न्यायाचा लढा लढतांना त्यांनी इंदिरा गांधी यांनी केलेल्या कार्यावरती प्रकाश टाकला. ऐकूणच राजेंद्र पाल गौतम यांनी आंबेडकरी मिशनच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती जागवली.

प्रदेशाध्यक्ष मा. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नासाठी आपण सतत संघर्ष करत राहू सामाजिक न्यायाचा लढा अहुरतपणे लढण्यासाठी राहुल गांधीच्या लढ्यात सक्रिय सहभाग देऊ अशा भावना व्यक्त करून पक्षाने अनुसूचित जाती तसे आंबेडकर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याची भूमिका मांडली. बैठकीचे मुख्य संयोजक राजेश लाडे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास उद्बोधित करत असताना देशात अनुसूचित जाती जमातीचे प्रलंबित असलेले प्रश्न, मागासवर्गीय विद्यार्थी तसे महिलावर होणारे अन्य अत्याचार, बजेटमध्ये केलेली अनुसूचित जातीसाठी जे तुटपुंजी  तरतूद यावरही बोलताना त्यांनी प्रशासनाचा धिक्कार केला. सर्व राजकीय मतभेद विसरून आंबेडकरी जनतेने व बहुजन समाजाने सामाजिक लढ्यासाठी अनुसूचित जाती काँग्रेस व आंबेडकर मिशनमध्ये आपले योगदान द्यावे तरच आपल्या जीवनात आपण काहीतरी प्राप्त केले असे होईल. आपणास जे काही मिळाले त्याचे शिल्पकार आपले भाग्यविधाते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत त्यामुळे अनुसूचित जाती काँग्रेसची भूमिका आंबेडकरी मिशनसाठी त्यागाची राहिलेली आहे. सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती राज्याचे नेते डॉ. नितीन राऊत व अनेक मान्यवरांनी विधानसभेत मागासवर्गीयाचे जे जे प्रश्न लावून धरले त्यावरही राजेश लाडे यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमात आ. संजय मेश्राम, गौतम गवई, ज्वलंत मुन, अश्विनी खोब्रागडे, भंडारा जिल्हाध्यक्ष मेश्राम, अकोल्याचे महेंद्र गवई, तसेच इतर सर्व जिल्हाध्यक्षांनी समायोजित भाषणे केली. यावेळी प्रामुख्याने विदर्भातील  प्रमोदींनी रामटेके, अनुताई दहेगावकर, रुपराज गौरी, राहूल घरडे, दिनेश वाघमारे, सुरेश मेश्राम, गोपाल राजवाडे, ॲड गौतमी नारनवरे, गौतम अंबादे, सागर खोब्रागडे, सुधीर खोब्रागडे, कुणाल रामटेके, अर्चना बडोले, संगीता चव्हाण, शैला दीक्षित, अनिल दहिवले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बैठकीचे मुख्य संयोजक राजेश लाडे यांनी राजेंद्रपाल गौतम, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तींअंबिरे व इतर मान्यवरांचा हार घालून सत्कार केला. या बैठकीला संपूर्ण विदर्भातून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय बोधी यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments