डॉ. रफीक जकरीया उर्दू प्रा. शाळेत मोफत पुस्तक वाटप सम्पन्न !
ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॅण्ड एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचलीत डॉ. रफीक जकेरीया उर्दू प्रा. स्कुल जफर खान चाल जुना जालना या शाळेत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक संस्था सचिव फरीदा जबीन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले । यावेळी अन्सारी नाजीया यास्मीन यांनी विद्यार्थीयांचे हजेरी प्रमाण वाढवावी म्हणून पालकांना विद्यार्थीयांनी दररोज काळजीने शाळेत हजर रहावे म्हणून अवाहन केले यावेळी सर्व शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते।
