त्रेतायुग फाउंडेशनकडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व्हिजनरी मेंटर पुरस्कार २०२५ प्रदान
देगलूर/प्रतिनिधी/ ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनाच्या विशेष प्रसंगी त्रेतायुग फाउंडेशन (भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था) तर्फे आयोजित कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील विशेष शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी अविनाश विठ्ठलराव अनेराये यांना “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व्हिजनरी मेंटर अवॉर्ड २०२५” ने सन्मानित करण्यात येणार आहे.
अविनाश अनेराये हे विशेष शिक्षण व समावेशक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना नवी दिशा मिळाली आहे.
या सन्मानाबद्दल अविनाश अनेराये यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून येणाऱ्या काळात विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी प्रयत्न करण्याची संधी देतो.”