पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आर.एस.एस.विरोधी जन
आक्रोश मोर्चा यशस्वी होणार
जालना: वंचित बहुजन आघाडीच्याव तीने औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर रोजी आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्व फुले शाहु आंबेडकरवादी विचारसारणीच्या लोकांनी या मोर्चात पुर्ण ताकतीने सहभाग नोंदवावा
फुले, शाहू, आंबेडकरवादी जनता, संघटना, नेते, आणि राजकीय पक्षांनी या आरएसएस विरोधातील जनआक्रोश मोर्चास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरीही जन आक्रोश मोर्चा यशस्वी होणारच असा निर्धार यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी माध्यमाशी बोलतांना व्यक्त व्यक्त केला आहे.