जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतागृह
‘पे ॲण्ड युज’ तत्त्वावर; इच्छुक संस्था, व्यक्तिंकडून सहभाग मागविला
छत्रपती संभाजीनगर – जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतागृह भाडेतत्त्वावर पे ॲण्ड युज धर्तीवर चालविण्या देण्याबाबत वार्षिक कंत्राट करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड यांनी कळविले आहे. यासंदर्भातील सर्व अटी शर्ती https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक व्यक्ती/ कंत्राटदार/ संस्था यांनी निविदा प्रक्रियेत दि.१५ ते २१ या कालावधीत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
