‘पुणे ग्रँड टूर’मुळे पुण्याचे नाव जागतिक पातळीवर – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २३ : ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून, याबाबत केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे प्रशंसोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेच्या (युसीआय) महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, अभिनेता अमीर खान, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले. या स्पर्धेला शहर व ग्रामीण भागातील क्रीडारसिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून, युवक, युवती, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी सर्व घटकांचा त्यात सहभाग दिसून आला. यापूर्वी पुण्यात झालेल्या स्पर्धेलाही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.