पुणे लघुपट महोत्सवात टॉस ला सर्वोकृष्ट प्रायोगीक लघूपटाचे बक्षिस
माजलगाव/प्रतिनिधी/ पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पंधराव्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टीवल-2025 मध्ये ए.डी फिल्म्स् अंतर्गत तयार झालेला व दिग्दर्शक अमर देवणे यांनी स्वतंत्ररित्या दिग्दर्शीत केलेल्या ‘टॉस’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लघुपटाचा बहुमान प्राप्त झाला असुन हा पूरस्कार प्रसिध्द सिने पत्रकार श्रीकांत कुलकर्णी सर व दिग्दर्शक-निर्माते म्हणून परिचित आसलेले श्री. नितिन लचके सर यांच्या हस्ते देण्यात आला.
‘टॉस’ या लघुपटात विष्णू उगले यांची मुख्य भुमिका असुन त्यांनी मानसिक संतुलन हरवलेल्या मध्यमवर्गीय इसमाची घालमेल उत्तमरित्या पडद्यावर साकारली आहे. या लघुपटाचे पटकथा लेखन हे लेखक आर. प्रकाश यांनी केले असुन ध्वनी व कला दिग्दर्शन सौरभ धापसे व निकेश भांगे यांनी केले आहे. ‘टॉस’ हा प्रयोगशील लघुपट कमी बजेट व कमी संसाधनामध्ये तयार केला आसल्याचे समजते. त्यामुळे या यशासाठी सर्व स्तरातुन ‘टॉस’ च्या टिमचे अभिनंदन होत आहे.