Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादज्ञानेश्वर कंटुले यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती; कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा

ज्ञानेश्वर कंटुले यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती; कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा

ज्ञानेश्वर कंटुले यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती; कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा
 
जालना/प्रतिनिधी/ कर्तव्यदक्षता,शिस्तबद्ध कामकाज आणि दांडगा जनसंपर्क यांच्या जोरावर पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्ञानेश्वर कंटुले (माऊली) यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती मिळाली आहे.शहागड पोलीस चौकी येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर कार्यरत असताना त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे ही पदोन्नती जाहीर करण्यात आली.
गृह मंत्रालयाच्या अपर सचिवांच्या विशेष आदेशानुसार ही पदोन्नती देण्यात आली असून,नव्या पदासोबत त्यांची नेमकी नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.मात्र,त्यांच्या पदोन्नतीमुळे अंबड तालुक्यासह संपूर्ण पोलीस वर्तुळात आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.ज्ञानेश्वर कंटुले हे अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात.जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे यशस्वीरीत्या हाताळली आहेत.कर्तव्याप्रती निष्ठा,तत्परता आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारी कार्यशैली यामुळे त्यांनी सहकाऱ्यांसह नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांच्या पदोन्नतीला त्यांच्या प्रामाणिक सेवेला मिळालेली योग्य दाद मानली जात आहे.
सन २०१३ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले होते.वरिष्ठतेच्या आधारे त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.
या पदोन्नतीनंतर गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर,बालाजी पदमने साहेब,तसेच जमादार रामदास केंद्रे,फुलचंद हजारे, गोपाल दिलवाले,चरणसिंग बामनावत,बाळासाहेब खवल  आदी सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मूळचे घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर कंटुले (माऊली) हे काही महिन्यांत सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती आहे.सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला दाद देत गृहशाखेने ही जबाबदारी सोपविल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत असून,त्यांच्या पदोन्नतीला त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान मानला जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments