Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादमाणगांव तालुका प्रेस क्लब पुरस्कृत आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान सन्मान सोहळा...

माणगांव तालुका प्रेस क्लब पुरस्कृत आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान सन्मान सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

माणगांव तालुका प्रेस क्लब पुरस्कृत आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्रदान सन्मान सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
आदर्श शेतकरी सन्मान सोहळ्याला अनेक मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी वर्गाची उपस्थिती
बोरघर/माणगांव/ ( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक १७ जुलै २०२५ रोजी माणगांव तालुका प्रेस क्लब आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५ सन्मान सोहळा माणगांव तालुका प्रेस क्लब चे पदाधिकारी, शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कृषी विभाग, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभाग इत्यादी खात्याचे प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
     जागतिक स्तरावर भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी उत्पन्न, कृषी पुरक व्यवसाय हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे असे मानले जाते. बळीराजा अर्थात शेतकरी हा सार्या जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते. कारण उन, वारा आणि पाऊस याची पर्वा न करता निसर्गाचा लहरीपणा अवर्षण, प्रवर्षण, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक स्थितीतअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतात अहोरात्र प्रचंड मेहनत करून आपले रक्त आटवून शेतातून विविध प्रकारचे अन्न धान्ये, तृणधान्य, भाजीपाला, फुलशेती, फळपिके, गायी म्हशी पालनाच्या माध्यमातून   दुग्धोत्पादन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन, वराह पालन, मधुमक्षिका पालन आणि औषधी वनस्पती इत्यादी शेतमालाची निर्मिती करून आपल्या सर्वांचे निरंतर पोषण करत असतो म्हणून तो समस्त जगाचा पोशिंदा आहे. अशा या जगज्जेत्या बळीराजाच्या अर्थात शेतकरी राजाच्या अपार कष्टाची दखल घेत त्याच्या या परोपकारी कार्याचा कुठेतरी सन्मान, गौरव व्हायलाच पाहिजे या शुद्ध प्रामाणिक भावनेतून माणगांव तालुका प्रेस क्लब ने आपले सामाजिक उत्तरदायित्त्व समजून आदर्श शेतकरी पुरस्कार सन्मान सोहळ्याचा संकल्प केला. या संकल्पने नुसार प्रतिवर्षी तालुक्यातील किमान दोन प्रगतशील शेतकर्यांची निवड करून त्यांना माणगांव तालुका प्रेस च्या वतीने त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांना जाहीर कार्यक्रमात गौरवण्यात येते.
     या वर्षी माणगांव तालुका प्रेस क्लब च्या माध्यमातून माणगांव तालुक्याच्या इंदापूर विभागातील माकटी या गावचे प्रगतशील शेतकरी गणपत गोविंद मुरकर हे गेली सहा दशके आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेऊन आपला कौटुंबिक चरितार्था बरोबर देशाच्या अर्थ व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी हातभार लावतात. तसेच माणगांव तालुक्याच्या निजामपूर विभागातील चाच गावचे प्रगतशील शेतकरी सहदेव सदू नाकते आणि सुजाता सहदेव नाकते या उभय दाम्पत्य प्रगतशील शेतकर्यांची निवड या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हे उभय दाम्पत्य प्रगतशील शेतकरी आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान व पूरक व्यवसायाची जोड देऊन आपल्या शेतात यशस्वी रीत्या खेकडा पालन करतात त्यांच्या या व्यवसायातून त्यांचा कौटुंबिक चरितार्थासह देशाच्या अर्थ व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी हातभार लावतात. या दोन्ही सन्मानित प्रगतशील शेतकर्यांचा आदर्श आजच्या नवीन पिढीने घेण्या सारखा आहे. म्हणून त्यांचा सन्मान करताना माणगांव तालुका प्रेस क्लब ला अभिमान वाटतो.
      सदर कार्यक्रमास माणगांव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार संतोष सुतार, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, उपाध्यक्षा आरती म्हामुनकर, मुख्य संघटक पद्माकर उभारे,कार्याध्यक्ष गौतम जाधव, सल्लागार उत्तम तांबे, सल्लागार विनोद सापळे, खजिनदार सचिन वनारसे, तालुका कृषी अधिकारी किरण पडवळकर, कृषी सहाय्यक बांगर, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, पोकॉ. दहिफळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र युवा सचिव, भूवन ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या श्रद्धा यादव,इंदापूर माजी उपसरपंच उदय अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. संदिपान सानप, तहसीलदार दशरथ काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, तलाठी साळवे, लक्षमण गोरेगावकर, गणपत डवले, दोन्ही ठिकाणचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments