आराध्या गायकवाडचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
वैजापूर/प्रतिनिधी/ तालुक्यातील नगीना पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तागड वस्ती शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आराध्या सुनील गायकवाड हिने सामान्य ज्ञान मंथन परीक्षेत वैजापूर केंद्रातून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच एमटीएस ओलंपियाड परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवले .यानिमित्त तिचा गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रवी जाधव ,विस्तार अधिकारी बाळासाहेब म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तिला मुख्याध्यापक अनिल सोनवणे व वर्गशिक्षिका कल्पना कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभले.
