Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादविद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध

होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

जालना :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी इयत्त 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्रे विहित वेळेत मिळण्यासाठी “दाखला आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नुकतेच इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्रे उदा. वय अधिवास व रहीवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, रहीवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी व प्रवेश सुरु झाल्यावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी “दाखला आपल्या दारी”  हा उपक्रम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दि. 26 ते 27 मे, 2025 पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सा. प्र. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments