Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 

आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख मा. खा. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७१ व्या वाढदिवस निमित्त औरंगाबाद जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील आदेश स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे केले होते. नुकतेच पहलगाम येथे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला केला व त्यात अनेक निर्दोष भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. सीमेवर असलेली तणाव पूर्ण परिस्थिती व त्यानंतर भारतीय सैनिकांकडून केलेले प्रत्युत्तर या सर्व गोष्टी लक्षात घेता बाळासाहेब आंबेडकरांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करता कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून व भारतीय सैनिकांच्या समर्थनात तिरंगा रॅलीचे आयोजन करून भारतीय सैनिकांना प्रोत्साहन पर उपक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून  क्रांती चौक येथील पक्ष कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.  सदरील कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष ॲड पंकज बनसोडे यांनी केले होते. सदरील उपक्रमास वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, प्रभाकर बकले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा संघटक सुभाष कांबळे, संपर्कप्रमुख गणेश कोतकर, उपाध्यक्ष अजय मगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments