Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादभाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात

भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी/ भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण हे आज दिनांक १३ जून २०२५ रोजी, “विकसित भारत का अमृत काल – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष” या पार्श्वभूमीवर जालना शहरात येत आहेत.

दुपारी ४ वाजता कलश सीड्स सभागृह, जालना येथे ते शहरातील व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, उद्योजक व विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी वर्गाशी थेट संवाद साधणार असून, शहराच्या सामाजिक, औद्योगिक व विकासात्मक दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत व नंतर पत्रकार परिषेद घेणार आहेत.

या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महत्त्वपूर्ण संवाद व पत्रकार परिषदेस नागरिक, पत्रकार व सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments