Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादविद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत रोजगाराचा विचार करावा – प्रा. डॉ. कार्तिक गावंडे

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत रोजगाराचा विचार करावा – प्रा. डॉ. कार्तिक गावंडे

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत रोजगाराचा विचार करावा – प्रा. डॉ. कार्तिक गावंडे

 जालना/प्रतिनिधी/ खरपुडी (ता.जालना) येथे अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) च्या शिबिराचे आयोजन पार्थ सैनिकी शाळा खरपुडी येथे करण्यात आले आहे शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा गांभीर्याने विचार करावा, असे मत प्रा.डॉ.कार्तिक गावंडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.शंकर तिकांडे यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून स्वतःची ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.मसुद अन्सारी, प्रा.डॉ.बद्रीनाथ शिंदे तसेच कृष्णा उगले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.डॉ.गावंडे म्हणाले की, ग्रामविकास साकार करण्यासाठी युवकांनी व्यावसायिकता अंगीकारणे आवश्यक आहे. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षण, उद्योगशीलता आणि सामाजिक भान यांचा समतोल साधल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी रोहित मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शंकर साळवी यांनी केले. कार्यक्रमास शिबिरार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments