जेष्ठ साहित्यिक प्रा.डाॅ.चंद्रकुमार नलगे यांना पेठ तालुका वाळवा येथील तिळगंगा साहित्यरंग परिवाराचा ” तिळगंगा जीवनगौरव पुरस्कार” प्रदान
ईश्वरपूर/प्रतिनिधी/ पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा साहित्यरंग परिवार,पेठ यांच्यावतीने आयोजित आठव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आलेला तिळगंगा जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता सन्मान त्यांच्या केर्ले येथील निवासस्थानी आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. आठव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनास नलगे सर प्रकृती अस्वस्थतेमुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे तिळगंगा परिवाराने त्यांच्या निवासस्थानी भेट देत हा सन्मान आदरपूर्वक प्रदान केला. राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते प्रा. डॉ. नलगे यांना प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. दीपक स्वामी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, मसाप शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक स्वामी, कवी उत्तम सावंत, प्राचार्य तांबोळी, आनंदहरी, प्रदीप नलगे, अनिता नलगे उपस्थित होते.