Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादपोलीस ठाणे न्यायालयाची पायरी महिला मुलींना चढण्याची वेळ येऊ नये हाच खरा...

पोलीस ठाणे न्यायालयाची पायरी महिला मुलींना चढण्याची वेळ येऊ नये हाच खरा सन्मान निधीतज्ञ संतोष झाल्टे यांचे प्रतिपादन

पोलीस ठाणे न्यायालयाची पायरी महिला मुलींना चढण्याची वेळ येऊ नये हाच खरा सन्मान निधीतज्ञ संतोष झाल्टे यांचे प्रतिपादन

कन्नड/प्रतिनिधी/ सिल्लोड तालुक्यातील ज्ञान विकास विद्यालय भराडी येथे कार्यक्रमात महिला व मुलीचा सन्मान करत आलो, करतच राहणार परंतु त्यांना पोलीस ठाणे, न्यायालयाची पायरी चढण्याची वेळच येऊ देऊ नये हाच खरा सन्मान म्हणता येईल, असे प्रतिपादन सिल्लोड न्यायालयाचे विधीतज्ञ संतोष झाल्टे यांनी भराडी येथे केले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या संकल्पनेतून भराडी ग्रामपंचायत,  महसूल मंडळ, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, शैक्षणिक विभाग, पोलीस विभाग यांच्या पुढाकाराने कन्या सन्मान दिवसाच्या निमित्ताने कार्यशाळा आयोजित करून आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळेस श्री झालटे बोलताना म्हणाले की, शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी आईचे नाव रेकॉर्डला घ्यावे, घरात ,समाजात महिलांना सुख, शांती, संरक्षण समाधान मिळावे हाच खरा स्वातंत्र्याचा महोत्सव म्हणता येईल.
यावेळी उस्मान शेख, प्रकल्पाधिकारी सिल्लोड सुनिता सणानसे, विधीतज्ञ निलोफर शेख, गोविंद झाल्टे, माजी उपसरपंच अनिस पठाण, सरपंच पप्पू जगनाडे, यशोदा शेळके ,वर्षा पांडव, जयश्री शेळके, देवयानी शेजुळ आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी रुक्मिणी माने, ज्ञानविकासचे रायभान जाधव तर आभार प्रदर्शन ग्राम अधिकारी वसंतराव पवार यांनी केले.कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी श्री वडगावकर, दिलीप सुसुंदरे पोपट तायडे, अरेफ पठाण, दीपक सोनवणे, यमुनाबाई राकडे, श्रीमती दरबस्तवार, श्रीमती पालोदकर, श्रीमती खोमणे, सुनिता गरुड, श्री शेख, किरण यादव, श्री सुरडकर, बाबुराव बिडवे, राम राकडे, आदिसह जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ज्ञानविकास विद्यालय, सरस्वती भुवन प्रशाला, होली फेथ इंग्लिश स्कूल भराडीचे शिक्षक वृंद विद्यार्थी हजार होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments