पिशोर येथे कार आणि सिमेंट मिक्सर टँकरचं भीषण अपघात पाच जण गंभीर जखमी
कन्नड /प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील पिशोर येथे कन्नड सिल्लोड रोड रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  कार आणि सिमेंट मिक्सर टँकरचा अपघात झाला. या अपघातात अशोक बकल, संतोष घोंगडे, हनुमान बळीराम कानखेड, समर्थ नेर संतोष घेवर  हॆ हिंगोली जिल्ह्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.नागरिकांनी  त्यांना उपचारासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले व तेथून प्राथमिक उपचार करून रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले व सध्या त्यांच्यावर  उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग आणि रस्त्याची परिस्थिती हे घटक कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.