पिंपरखेडा येथे शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे सुरुवात
कन्नड ग्रामीण/ प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा येथे श्रीक्षेत्र अनवा संस्थान चे पंधरावे विद्यमान अधिपती सद्गुरु प.पू.श्री ज्ञानेश्वरमाऊली महाराज चातुर्मास्ये मार्गदर्शनाखाली व गुरुवर्य श्री कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांच्या अमृत वाणीतून शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच ते सहा काकडा आरती,सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा, विश्रांती नंतर
दुपारी ३ ते ५ शिवलीलामृत पारायण,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ०८ ते १० हरिकीर्तन होणार आहे.
दि १६ बुधवार रोजी ह.भ.प. गणेश महाराज भालकर पिंपरखेडा गुरूवार रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज बसंते रेलगाव शुक्रवार ह.भ.प. प्रभाकर महाराज कदम आमठाणा शनिवार ह भ प विठ्ठल महाराज शिरसाट सावंगी रविवार ह भ प मनोज महाराज भाग्यवंत सिल्लोड सोमवार ह भ प राधेश्याम महाराज चातुर्मास्ये अनवा संस्थान पंढरपूर मंगळवार ह भ प संदीप महाराज वाडेकर चिंचोली नकीब.
तसेच सप्ताहाची सांगता दि.२३ बुधवार रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प.श्री.सतगुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये अनवे पंढरपूर संस्थान यांचे काल्याचे कीर्तन होणार असून यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पिंपरखेडा येथील ग्रामस्थांनी केले आहे.