Saturday, October 25, 2025
HomeUncategorizedपिंपरखेडा येथील जिजाबाई हांडे यांचे निधन

पिंपरखेडा येथील जिजाबाई हांडे यांचे निधन

पिंपरखेडा येथील जिजाबाई हांडे यांचे निधन

कन्नड ग्रामीण प्रतिनिधी.सुनिल निकम कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा येथील ५४ वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान बुधवार रोजी सकाळी पाच वाजता मृत्यू झाला. त्यांना अंत्यविधीसाठी पिंपरखेडा येथे आणले असता मयताच्या  नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांचे शववीच्छेदन करण्यात यावे यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांना नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पिशोर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रनोती हेडाऊ  यांनी शवाविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिजाबाई पंडित हांडे (५४) रा. पिंपरखेडा ता. कन्नड असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरखेडा या मूळ गावी साडेचार वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार किरण गंडे हे पुढील तपास करीत आहे. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments