Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादपिंपळगाव किसान क्रांती चौक येथे "शेतकऱ्यांचे सामुहिक आमरण उपोषण" तात्पर्य स्थगित

पिंपळगाव किसान क्रांती चौक येथे “शेतकऱ्यांचे सामुहिक आमरण उपोषण” तात्पर्य स्थगित

पिंपळगाव किसान क्रांती चौक येथे “शेतकऱ्यांचे सामुहिक आमरण उपोषण” तात्पर्य स्थगित

आत्ताच एक्सप्रेस

गंगापूर /प्रतिनिधी/ डोणगाव मंडळातील शेतकऱ्यांचे सामुहिक उपोषण पिंपळगाव दिवशी किसान क्रांती चौकात सलग ४ दिवसांपासून शेतकरी कृती समितीचे इंजी.महेश गुजर व शेतकरी यांच्या वतीने सुरु होते. आंदोलन दरम्यान तहसील प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन जाहीर करताच महसुल प्रशासन खडबडून जागे झाले आणि दि ६ नोव्हेंबर रोजी  नायब तहसीलदार वाघमारे आंदोलन स्थळी दाखल झाले.तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले दरम्यान जेष्ठ शेतकर्यांनी मध्यस्थी केल्यानंतर निवडणूकीच्या कामात व्यस्त असलेले तहसीलदार नवनाथ वागवाड, गटविकास अधिकारी वाघमारे व तालुका कृषी अधिकारी जायभाय यांच्या सहीने नायब तहसीलदार यांच्या हस्ते शेतकरी मागण्या बाबतीत खालील प्रमाणे लिखीत दिल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले

१) खरिप २०२४ चे अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान यांचे VK नंबर देऊन KYC करुन घेऊन रक्कम खात्यावर जमा करणे बाबत या कार्यालयाने खरिप  सर्व अनुदान याद्या DBT पोर्टल ला upload केलेल्या आहेत, सध्या शासना मार्फत ckyc साईट तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे तरी शासना मार्फत skye साईट सुरु झाल्यानंतर ckye करण्यात येईल.
२) खरिप २०२५ चे अतिवृष्टी नुकसानीच्या याद्या VK नंबरसाठी जमा करून KYC करून घेऊन अनुदान वाटप करणे बाबत या कार्यालयाने खरिप 2025 मधील सर्व अनुदान याद्या DBT पोर्टल ला upload केलेल्या आहेत, व दिनांक ०४-११-२०२५ रोजी पासून अनुदान रक्कम पडण्यास सुरुवात झालेली आहे.
३) पिक विमा खरिप २०२५ च्या नविन नियमानुसार पिक कापणी प्रयोग करताना सदरचे प्रयोग महसूल विभाग, पंचायत समिती व कृषी विभाग मार्फत विमा कंपनी प्रतिनिधी व ग्राम स्थरीय समिती यांचे उपस्थित पिक कापणी प्रयोग केले जात शासन नियमा नुसार पिक कापणी प्रयोग केले जातील,
४) शासन निर्णय नुसार रब्बी हंगामाच्या पेरणी साठी बियाणे खरेदी करण्यासाठी १०,००० हेक्टरी देणार होते त्यानुसार कृषी विभागाने नियोजन करावे करीत शासना मार्फत निधी प्राप्त होताच तात्काळ निधी वितरण बाबत च्या याद्या DBT पोर्टल ला upload करण्यात येतील.
५) अतिवृष्टी २०२५ मुळे झालेल्या वैयक्तिक नुकसानीचे NDRF मधुन नवीन शासन निर्णय नुसार रक्कम जमा करा त्याबाबत शासन निर्णयातील निकषा नुसार नुकसान भरपाई वितरीत करण्यात येईल.
६) पिक कर्ज प्रकरणाची कर्जमाफी याबाबत आपले निवेदन शासन दरबारी पाठविण्यात येईल.
७) शिव पानंद व नकाशा असलेले सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढण्याची कारवाई सुरु करा या बाबत नियमानुसार कार्यवाही सुरु आहे.
८) लासूर स्टेशन महावितरण कार्यालयात रब्बी हंगामासाठी ६३ HP च्या ३ व १०० १HP च्या दोन कृषी रोहोत्री राखीव उपलब्ध करून ठेवा या बाबत आपली मागणी संबंधित यंत्रणेस कार्यवाही साठी पाठविण्यात येईल.
९) रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीरी, गायगोठे अनुदान मागील ८ महीन्यापासुन जमा करण्यात आले नाही ते जमा करण्याची नियोजन करावे या बाबत सदर निवेदनामध्ये त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी, गायगोठे यांचे अनुदान मिळणे बाबत वरीष्ठ कार्यालयास कुशल कुशल निधी मागणी सादर केलेली असून सदर निधी प्राप्त होताच वितरीत करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक कृषी अधिकारी रामेश्वर दहीडर,
मंडळ अधिकारी अंजली घुगे.पिंपळगावचे तलाठी डि टी गायके.रायपुरचे सुरेश ठेंगडे. कृषी सहाय्यक बकडे मॅडम,पोलीस कर्मचारी योगेश हरणे,तायडे व पिंपळगाव,दिवशी पाचपिरवाडी,रायपुर,डोणगाव,बाभुळगाव,पाडळसा,देर्हळ,सनव,दिनवाडा,किन्हळ गावातील तसेच परिसरातील गरजवंत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments