पिंपळवाडी पिराची येथील दोन दिवसीय इज्तेमा नियोजन बद्ध आणि शांततेत संपन्न
पिपंळवाडी/प्रतिनिधि/ पिंपळवाडी पि. येथे गेल्या काही दिवसा पासुन इज्तेमा ची तयारी मोठ्या जोराने चालु होती. यामध्ये अनेक भावीकांनी स्वयं सेवक बनुन सहकार्य केले, अतिशय कटीबंध पद्धतिने नियोजन केले होते. भाविकांच्या सुविधा साठी फोर व्हीलर,टु व्हीलर पार्किंग,१०० शौचालय ,३०० वजुखाने उपलब्ध करून देण्यात आले होते. आरोग्य सेवे साठी दवाखाना,सहा वैद्यकीय अधिकारी आणि दोन ऍम्ब्युलस तैनात ठेवन्यात आले.
सुमारे सात हजार ते साडे सात हजार स्क्वेयर फुटांचे भव्य पींडाल उभारण्यात आले होते. अनेक हॉटेल्स मध्ये अल्प दरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या इज्तेमा मध्ये चितेगांव,वाडगाव,बिडकीन,सपोरी,
लोहगांव,कारकीन, पिंपळवाडी , बालानगर या आठ सेंटर चे सरासरी वीस ते पंचवीस हजार भावीकांनी उपस्थितति लावली. हजारों च्या संख्येने उपस्थित असणारे भावीकांनी हा दोन दिवसीय इज्तेमा शांततेत आणि नियोजित पद्धतिने पार पाडला.
या इज्तेमाला सर्व धर्मीय नेते मंडळीं नी मुलाखती दिल्या आणि मुस्लीम धर्म गुरु (मौलाना) तर्फे त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीने सह पोलीस निरीक्षक ईश्र्वर जगदाळे यांनी आपल्या सर्व कर्मचार्या सह बंदोबस्त ठेवला.