फुलंब्रीत बेमोसमी पाऊस, शेतकर्यांसह व्यापारींची फजीती
फुलंब्री /प्रतिनिधी/ सरफराज पटेल /फुलंब्री शहर व तालुक्यात काल दिनांक ३ मार्च रोजी
दुपारी तीन वाजेपासुन रात्री पर्यंत जोरासह रिमझिम पाऊस पडला, या बेमोसमी पावसाने सर्व सामान्य शेतकर्यांच्या रब्बी हंगामातील उरेल सुरेल पीकांची नुकसान झाली. तसेच व्यापारींचे अचानक पाऊस आल्याने त्यांची फजीती उडाली. फुलंब्री तालुक्यातील पाल, वडोदबाजार, धामणगाव, पिरबावडा, आळंद , बाबरा, गणोरी, उमरावती, वानेगाव, वारेगाव, किनगाव, बाजार सावंगी सर्कल इतर ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकरी यांच्या उरेल सुरेल पीकांची नुकसान झाली आहे. बेमोसमी पावसाने व्यापारींची फजीती उडाली. भर उन्हाळ्यात पावसाळा सुरु झाला काय असा प्रश्न पडला आहे.बेमोसमी पावसाने वातावरण बदल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम जाणवत आहे.सर्दी, खोखला, ताप यासह इतर रोग निर्माण होत आहे.यामध्ये रुग्णालयात रुग्णांची भरती होत आहे, खासगी रुग्णालयांचे अर्थीक फायदा होताना दिसत आहे.फुलंब्री शहर व तालुक्यात गारपीटीचा पाऊस पडल्याने भर रस्त्यांवर गारा पडल्याचे दिसत आहे.काही ठिकाणी नुकसान झाले तर ठिकाणी जिवीतहानी टळली , फुलंब्री शहरातील खुलताबाद रोड वर पावसाचे पाणी वाहुन जात होते, काही दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरले यामध्ये व्यापार्यांच्या सामानाचे नुकसान झाले.