पिशोर नाचनवेल चिंचोली लिं परिसरात रब्बी पेरणीला वेग
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यात नाचनवेल पिशोर चिंचोली लिं करंजखेडा परीसरात गहू मका हरभरा खरीप पिकावर शेतकऱ्याचा जास्त भर खरीप
हंगामात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बी हंगामासाठी कापसाचे फडदर पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
यंदा अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. अद्रक पिकांवर मर व कंद कुज रोग येऊन गेला तर कापूस पिकांची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली.
ऑक्टोबर आणि दिवाळीनंतर रखडलेल्या रब्बी पिकाने आता
गती घेतली आहे. मका, हरभरा व गहू पेरणी उरकताना शेतकरी दिसून येत आहे. यंदा तालुक्यात रब्बी हंगामासाठी ४५ हजार १०६ हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. पेरणीला उशीर झाल्याने ४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर सुमारे ११ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने हंगामी व आडसाली ऊस, शाळू ज्वारी, गहू, मका व हरभरा पिकांचा समावेश आहे. ओलीत क्षेत्रात आडसाली ऊस, गहू, मका, कांदा, कांदा बिजात्पोदन, उन्हाळी बाजरी पेरणीकरडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे