नाचनवेल पिशोर चिंचोली परिसरात कोळपणीच्या कामांना घेतला वेग
कन्नड/प्रतिनिधी/ पिशोर नाचनवेल चिंचोली परिसरासह ग्रामीण
भागात पिकांच्या अंतर्गत मशागतीने वेग घेतला आहे. कपाशी, मका, सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांची कोळपणी शेतकरी करत आहे. तण नियंत्रणासाठी शेतकरी बैलजोडीच्या साह्याने कोळपणी करत आहेत. नाचनवेल पिशोर चिंचोली परिसरात पेरणीनंतर पिकांमधील तणांचा उपद्रव वाढला आहे. तणमुक्त शेतीसाठी शेतकरी सध्या कोळपणीला प्राधान्य देत आहेत. अनेक ठिकाणी बैलजोडीच्या साहाय्याने कोळपणी करण्यात येत आहे.महागाई आणि मजूर टंचाईमुळे मनुष्यबळावर होणारा खर्च टाळण्यासाठी अनेक शेतकरी तणनाशक फवारणीला ही पसंती देत
कृषी दुकानदारांकडून रासायनिक खरेदी खते करताना लिंक खत खरेदीसाठी दबाव आणला जात आहे.आहेत. कोळपणी झाल्यानंतर खत टाकण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कृषी दुकानदारांकडून रासायनिक खते खरेदी करताना लिंक खत खरेदीसाठी दबाव आणला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे गरज नसतानाही शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च करावा लागत आहे.मजूर टंचाईची समस्या
खुरपणीसाठी मजुरी ३०० रुपयांवर गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. ग्रामीण भागात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कृषी कामांसाठी यंत्रसामुग्रीवर भर दिला जात आहे