Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादपिशोर शफेपूर येथील मुगदेश्वर महादेव महाराज सप्ताहाची सांगता ह भ प मनोज...

पिशोर शफेपूर येथील मुगदेश्वर महादेव महाराज सप्ताहाची सांगता ह भ प मनोज महाराज भाग्यवंत यांच्या कीर्तनाने झाली

पिशोर शफेपूर येथील मुगदेश्वर महादेव महाराज सप्ताहाची सांगता ह भ प मनोज महाराज भाग्यवंत यांच्या कीर्तनाने झाली
कन्नड/ ग्रामीण प्रतिनिधी /सुनिल निकम/कन्नड तालुक्यातील पिशोर शफेपूर येथील मुगदेश्वर महादेव महाराज मळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनाचा व भंडाऱ्याच्या  महाप्रसादाचा कार्यक्रम दि. ३१ सोमवार रोजी झाला.
संताच्या सहवासामुळे माणसाचा उद्धार होतो. यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती करायची असेल तर चुकीच्या मार्गाला न जाता ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल करावी, जेणेकरून आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. संताच्या सोबतीने तुमचे कल्याण निश्चित आहे. असे ह.भ प मनोज महाराज भाग्यवंत ज्ञानेश्वर माऊली संस्थान सिल्लोडकर यांनी
 केलेल्या कीर्तनाने उपस्थित भक्तमंडळी मंत्रमुग्ध झाले होते.मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो या जन्मात माथा ठिकाणावर राहावा म्हणून गाथा वाचावी.व नराचा नारायण व्हावा यासाठी पारायण सप्ताहाचे सांगताचे कीर्तन करताना ह भ प मनोज महाराज भाग्यवंत संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान सिल्लोडकर यांनी   बोलताना  सांगितले की, खरा काला प्राप्त करणे म्हणजे जीवन सफल होणे, जीवन पुर्ण होणे आणी पुर्ण स्वरुप भगवंत आहे त्याची प्राप्ती करणे म्हणजे काला आणी पुर्ण स्वरुप भंगंत प्राप्तीचा काला प्राप्त करण्याठी आपल्या मनातील भेद नष्ट करावा लागेल, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला या कीर्तनातून सांगितले सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments