महिलांना समान भागीदारीने नेतृत्वाची संधी.
आत्ताच एक्सप्रेस
पैठण/प्रतिनिधी/पैठण तालुक्यातील आगामी येणाऱ्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी 110 ग्रामपंचायतचे आरक्षण प्रक्रिया काल दिनांक 15 एप्रिल रोजी तहसील कार्यालय येथे पारदर्शकतापूर्ण पद्धतीने उपविभागीय अधिकारी नीलम बाफना ज्यांच्या मार्गदर्शन खाली दिनेश संपले तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी पैठण नेतृत्वात पार पडली. आरक्षण प्रक्रियेनुसार 110 ग्रामपंचायत पैकी 50% म्हणजेच 55 ग्रामपंचायती महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत मारल्याच्या नेतृत्वाखाली येणार आहेत उर्वरित पंचावन्न ग्रामपंचायत मध्ये पुरुष सरपंचांची निवड होणार आहे. मागच्या व सध्याच्या काळात जांभळी टाकळी ढाकेफळ पैठण मुलांनी वडगाव हे रोडपुरी कुरण पिंपरी कोरडी बुद्रुक आखातवाडा पाडळी गाजीपुर इंदेगाव बालानगर पाचोड खुर्द कृष्णापुर दीनानाथ नगर दादेगाव बुद्रुक चांगतपुरी आणि खादगाव या गावांमध्ये महिला सरपंच नेतृत्व करत होत्या नवीन आरक्षण नुसार १) खुला प्रवर्ग ६२ ग्रामपंचायती ह्या (महीला-३१ पुरूष-३१) २)ओबीसी प्रवर्ग-२९ग्रामपंचायती
ह्या (महीला- १५ पुरूष-१४).
३) अनुसूचित जाती प्रवर्ग-१६ ग्रामपंचायती.
ह्या (महीला-०८ पुरूष-०८).
४) अनुसूचित जमाती प्रवर्गसाठी-०३ग्रामपंचायती.
ह्या (महीला-०२पुरूष-०१)अशे प्रकारे एकुण-११०ग्रामपंचायत आरक्षण वर्ष २०२५.ते २०३०का कालावधीत होणार ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून कायदेशीररित्या जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण सोडवणुकीसाठी पूर्ण पैठण तालुक्यातील नागरिकांनी माझी आजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक भावी सरपंच पत्रकार बांधव व इतर अतिउत्साही कार्यकर्त्यांनी खूप मोठी गर्दी केली होती तर पैठण तहसील कार्यालयाला सण-उत्सवाचे स्वरूप आले होते.सदरची प्रक्रिया
मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना
यांच्या निरीक्षणाखाली तहसीलदार पैठण दिनेश झांपले यांनी ११०ग्रामपंचायत आरक्षण सोडत काढली . उपस्थित नायब तहसीलदार विष्णू पुरी,राहुल बनसोडे, नायब तहसीलदार प्रभाकर घुगे(नायब तहसीलदार),बहुरे,मशरूफ महसूल सहाय्यक अमोल पाखरे,रेवनाथ खेडकर,दादासाहेब गटकळ,सोमनाथ कोल्हे,इम्रान शेख यांनी सहकार्य केले.