एमजीएमच्या तीन विद्यार्थ्यांची पीसीआय‘च्या आंतरवासितेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) ऑटम आंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम २०२५ साठी निवड झाली आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्लीच्या वतीने ही इंटर्नशिप देण्यात येते. यामध्ये बी.ए.आंतरराष्ट्रीय पत्रकारिता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची विद्यार्थिनी अदिती शर्मा, एम.ए.ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनची विद्यार्थिनी तनुष्का कडू आणि अद्वैत क्रिष्ण प्रताप यांना एक महिन्याच्या कालावधीत दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळाली आहे.
पीसीआय ही एक वैधानिक स्वायत्त संस्था असून वृत्तपत्र स्वातंत्र्य जपण्यासाठी समर्पित आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना ‘पीसीआय’ची कार्यपद्धती समजून घेताना माध्यम क्षेत्राचा अभ्यास करता येणार आहे. पीसीआय वर्षातून दोन वेळा इंटर्नशिप कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये देशभरातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात आणि केवळ गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जाते.
