Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादपावसात वाकलेले विद्युत खांब केले सरळ

पावसात वाकलेले विद्युत खांब केले सरळ

पावसात वाकलेले विद्युत खांब केले सरळ

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने झाडे कोसळून महावितरणच्या हर्सुल शाखेअंतर्गत विविध ठिकाणी उच्चदाब वाहिनीचे 5 तर लघुदाब वाहिनीचे 2 खांब वाकले होते. महावितरणने सोमवारी रात्रीच पर्यायी मार्गाने ग्राहकांचा विद्युतपुरवठा सुरू केला होता. मंगळवारी वाकलेले विद्युत खांब सरळ करण्यात आले.

सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे हिमायतबाग परिसरातील प्रोफेसर कॉलनी तसेच ताज हॉटेलसमोरील वानखेडेनगरमध्ये उच्चदाब वाहिनीवर मोठमोठी झाडे कोसळून विद्युत खांब वाकले होते. महावितरणने पाऊस थांबताच युद्धपातळीवर देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली. विविध पर्यायी वाहिन्यांद्वारे रात्री 12 पर्यंत बहुतेक भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. मंगळवारी सकाळीच महावितरणने नुकसान झालेले खांब पुन्हा उभारण्याचे काम हाती घेतले. शहागंज उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजीव कोंडगुळी, हर्सुल शाखेचे सहायक अभियंता राजेंद्र राठोड व तंत्रज्ञांनी तसेच कंत्राटदार तय्यब नाईकवाडी यांच्यासह कामगारांनी यासाठी परिश्रम घेतले. उच्चदाब वाहिनीचे वाकलेले 3 खांब सरळ करण्यात आले. तर अधिक नुकसान झालेले 2 खांब बदलण्यात आले. लघुदाब वाहिनीचे तुटलेले 2 खांब बदलण्यात आले.

            कॅप्शन : वानखेडेनगर, प्रोफेसर कॉलनीत वाकलेले खांब सरळ करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments