अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांच्याशी सैय्यद लायकोद्दीन यांची अल्पसंख्यांक समाजाचा विविध मुद्द्यांवर चर्चा
औरंगाबाद- पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या विशेष बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन यांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत शिक्षण, रोजगार, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, धार्मिक स्थळांचा विकास, तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवावयाच्या योजनांबाबत मुद्देसूद मांडणी करण्यात आली.
आमदार रोहित पवार यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, पक्ष पातळीवर आणि सरकारदरबारी योग्य पाठपुरावा करून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
सैय्यद लायकोद्दीन यांनी ही बैठक समाजाच्या हितासाठी अत्यंत फलदायी ठरल्याचे सांगितले असून, लवकरच काही ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सुचनेनुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.याप्रसंगी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रज्जाक पठाण,अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अशरफ पठाण, सलीम पटेल वाहेगावकर, प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक,अफरोज खान आदिंची उपस्थिती होती.