पत्रकार गणेश कदम यांची न्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती
देगलूर/प्रतीनीधी/ बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथील रहीवाशी असलेले गणेश प्रकाशराव कदम यांची न्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या मराठवाडा सचिवपदी गणेश कदम यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या समाजकार्याची दखल घेत, उपस्थित सर्व सदस्यांनी संमती दर्शवून ही निवड केली.
गणेश कदम हे समाजात सक्रियपणे कार्यरत असून, गोरगरीब आणि वंचित वर्गासाठी त्यांनी सातत्याने सेवा दिली आहे. त्यांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पुढील काळात कार्य होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्र संपर्कप्रमुख भूपेंद्रसिंग बडगुजरा यांनी नविन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संपादक दिनेश भालेराव, महाराष्ट्र उपाध्यक्ष ओमकार मोतेवाड, पत्रकार विकास बढे, पत्रकार सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते, संपादक,पत्रकार,मित्र परिवार गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अभिनंदनाचा वर्षाव सुभेच्छा दिल्या आहेत.