पतसंस्था व मल्टीस्टेच्या अडचणी सोडवण्याकरिता मंत्र्यांना निवेदन
संचालक ॲड. रविंद्र कानडे यांनी मांडल्या संस्थांच्या व्यथा
सहकार मंत्र्यांनी घेतली तात्काळ दखल ; तातडीने बोलावली बैठक
माजलगाव /प्रतिनिधी/येथील लोकनेते सुंदरराव सोळंके नागरी सहकारी पतसंस्थेच्या तेलगाव शाखेच्या च्या नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील हे दिनांक 21 एप्रिल रोजी आले असता पतसंस्था व मल्टीस्टेच्या अडचणी सोडवण्याकरिता सहकार मंत्र्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे संचालक ऍड. रविंद्र कानडे यांनी सविस्तर निवेदन दिले यावर विचार नक्कीच करू असे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था व फेडरेशन यांच्या कायद्यामध्ये आवश्यक तो बदल व्हावा वसुली कायदे यामध्ये देखील सुधारणा व्हावी कलम 101,156, व विक्री अधिकारी यांच्या कायद्यामध्ये सुधारणा होऊन भक्कमपणे संस्थांना काम करता यावे तसेच संस्थेच्या गुंतवणुकी बाबत सुरक्षितता तसेच सभासदांच्या ठेवीना विमा संरक्षण मिळावे त्याचबरोबर योग्य कर्जदार सभासद निवडता यावा करिता सिबिल सारख्या कंपन्या संस्थांना जोडता याव्यात व सहकार समृद्ध होण्यासाठी आवश्यक त्या सर्व इतर बाबींच्या सुधारणा करण्यासंदर्भातले सखोल मागण्यांचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला असुन प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री यांनी देखील सहकारात्मक भूमिका घेऊन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकार निश्चितच काम करेल असे आश्वासन दिले यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके , जिल्हाधिकारी अविनाश पाठक , उपजिल्हा निबंधक समृद्ध जाधव यांच्या समवेत निवेदन सादर करण्यात आले.