आत्ताच एक्सप्रेस
पैठण /प्रतिनिधी/ पैठण तालुक्यातील पारुंडी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शालेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनवर आधारित आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणे सर्वांना मंत्रमुग्ध करणारी होती.
या प्रसंगी पारुंडी ग्रामपंचायत चे श्री.दत्ता दौंड (सरपंच), जाकीर शेख (उपसरपंच), रुपाली थोरात मॅडम (तलाठी) अर्जुन जाधव (महसूल सेवक),सोपान लांडे (ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर), भरत दौंड, पांडुरंग दौंड, नितीन निसर्गे, भाऊसाहेब मुंढे, रामेश्वर दौंड,नजीर टेलर,कृष्णा दौंड, विजय निसर्गे, जिल्हा परिषद शाळेचे मुखध्यापक,सह ईतर मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.