Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादपरतूरच्या विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा  हर्षवर्धन सपकाळ :...

परतूरच्या विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा  हर्षवर्धन सपकाळ : परतूरच्या सभेत केले मतदारांना आवाहन 

परतूरच्या विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा 

हर्षवर्धन सपकाळ : परतूरच्या सभेत केले मतदारांना आवाहन 
परतूर – सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता परतूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नगरपरिषद निवडणूक लढवीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
   शहरात शनिवारी (दि. 22) रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी माजीमंत्री राजेश टोपे,खा. कल्याण काळे,आ. राजेश राठोड,प्रदेश सचिव समद पटेल, सिद्धार्थ हत्तीअंभीरे, राजेंद्र राख,कल्याण सपाटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, माजी नगराध्यक्ष विनायक काळे, माजी उपाध्यक्ष विजय राखे, ऍड. विशाल बागल यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा बंड, ऍड. विशाल बागल यांच्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती होती.
   यावेळी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार हे दोन्ही पक्ष विकासाच्या मुद्द्यावर सर्व निवडणुका लढतात. परतूर नगरपालिकेची निवडणूक देखील विकास कामांच्या मुद्द्यावरच आम्ही लढत आहोत. या शहरात अनेक समस्या आहेत. आतापर्यंतच्या राजकारण्यांनी शहरात कुठलीही भरीव विकास कामे केल्याचे दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून विकास कामांना साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
   माजीमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कधीही जातीधर्माच्या नावावर निवडणूक लढवित नाही. आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे. सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या आहेत. परतूर शहराच्या विकासासाठी एकवेळ काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला निवडून देत विकास कामे करण्याची संधी द्या असे आवाहन टोपे यांनी केले.
   कार्यक्रमात प्रास्ताविक करताना कपिल आकात म्हणाले की,वरिष्ठ नेत्यांच्या सुचनेप्रमाणे आम्ही शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी आघाडी केली. पूर्ण ताकदीने आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   योगेश बरीदे यांनी सूत्रसंचालन करताना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचा परिचय करून दिला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments