Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादपरतूर शहरात विकास कामे करण्यासाठी सदैव तयार- मोहन अग्रवाल

परतूर शहरात विकास कामे करण्यासाठी सदैव तयार- मोहन अग्रवाल

परतूर शहरात विकास कामे करण्यासाठी सदैव तयार- मोहन अग्रवाल

 परतुर/प्रतिनिधी/ शहरातील जुना मोंढा परिसरातील खंडेलवाल गल्लीतील श्री दत्त मंदिर येथे 20 लक्ष रुपये किमतीचे सभा मंडपाचे भूमिपूजन शिवसेना नेते मोहन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले सदर सभा मंडपासाठी निधी शिवसेना नेते मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेला असून या प्रसंगी दत्त मंदिर परिसरातील नागरिकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कारही कऱण्यात आला. सत्कारला उत्तर देताना अग्रवाल म्हणाले की, परतूर शहरातील सी. सी. भूमिगत नाली बांधकाम, रस्ते नाल्या ,40 फुटी विद्युत खांब, सभा मंडप विविध नागरिकांच्या समस्या सोडविण्या विषयी मी कटिबद्ध असून शासनाकडून निधी विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही व बाकी असलेले विकास कामे करण्याकरिता सदैव तत्पर राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. यावेळी नगरसेवक राजेश खंडेलवाल उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले तालुका प्रमुख अमोल सुरुंग,व्हीजीएनटीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे, शहर प्रमुख दीपक हिवाळे, युवा सेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे, श्याम शेठ खंडेलवाल, योगेश खंडेलवाल, लक्ष्मीकांतराव हातवनकर, नटवर खंडेलवाल, पावले गुरुजी, गुणवंत मोर, लक्ष्मीकांत हतवनकर, जयंत हतवणकर ,गोविंद शर्मा, निखिल अग्रवाल, लखन जोशी,शिवा जोशी, प्रणय मोर, सौरभ भारुका, अशोक लाळे, शिवा जोशी, गोपाल गेलोत, केदार खंडेलवाल, यांच्यासह जुना मोंढा परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, जवळपास आज पर्यंत परतूर शहरात 28 कोटी रुपयांची विकासाची कामे माजी नगराध्यक्ष मोहन अग्रवाल यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments