परतुर तहसीलदारांनंतर अंबड तहसीलदारांवर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला; जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आमदार लोणीकर
अंबड/प्रतिनिधी/ अंबड व घनसावंगी तालुक्यातील ३० ते ३५ गावांमध्ये दररोज ५०० हायवाच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करून बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाठवला जातो नियमाप्रमाणे नदीवरील पुलापासून किंवा पाण्याच्या विहिरीपासून किमान ५०० मीटरच्या आत वाळू उपसा करता येत नाही असे असताना फुलाच्या व गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या विहिरी शेतकऱ्यांच्या विहिरी यांच्या अगदी ५० ते १०० फूट अंतरावर प्रचंड वाळू उपसा करण्यात आला असून या अवैध वाळू उपसामुळे गोदावरी नदीवरील पूल कोसळण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. दररोज २० ते ३० टन वजनाचे ५०० हवा ट्रक भरून अवैध वाळू उपसा करत असल्यामुळे सर्व ग्रामीण व तालुका मार्ग असणारे डांबरीकरणाचे रस्ते फुटलेले आहेत. असेही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.
वाळू माफिया व प्रशासन यांच्या संगनमताने हा अवैध वाळू उपसा सुरू असून या प्रकरणात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक अजिबात गंभीर नाहीत असेच दिसून येत आहे. आपण स्वतः जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये व विधानसभा अधिवेशनामध्ये या बाबी वारंवार मांडल्या असून प्रशासनाने या बाबींकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून येते ही बाब अत्यंत गंभीर असून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफी यांची वाहने जप्त करून त्याचा लिलाव करण्यात यावा त्याचबरोबर या सर्व गुन्हेगारांवर हद्दपारी ची कारवाई करण्यात यावी आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे किती अवैध वाळू साकारण्यात आला याची मोजमाप करून वाळू मफियांच्या संपत्तीतून शासनाच्या महसुलाची रिकवरी करण्यात यावी अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
अंबड तहसीलदार श्री विजय चव्हाण हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गस्त घालत असताना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाळू माफीयांनी तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला तहसीलदारांनी बाजूला पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे थोडक्यात बचावले परंतु त्यानंतरही वाळू माफी यांनी सामूहिकरीत्या लाठ्या-काठ्यांसह तहसीलदारांवर हल्ला करून त्यांना जखमी केले, ट्रॅक्टर पकडणे व सदरील हल्ला या दोन्ही बाबींमध्ये तहसीलदार चव्हाण यांच्या सहकाऱ्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे यापूर्वी देखील परतुर तहसीलदार यांच्यावर प्राणघतक हल्ला झाला होता या बाबीचा दाखला देत आमदार बबनराव लोणीकर यांनी संबंधित वाळू माफीयांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अंबड तहसीलदार श्री विजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहागड येथे हायवा माध्यमातून अवैध वाळू सासू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तहसीलदार चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी सकाळी ६ वाजेपासून शहागड येथे गस्त घालत होते तहसीलदाराने प्रत्यक्ष पाहणी केली असता १५ लोक अवैध वाळू भरना करत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये गेवराई येथील ईशान इब्रान खान या वाळू माफिया सह त्याच्या इतर ३ सहकाऱ्यांनी तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंगावधान राखून तहसीलदारांनी आपल्या खाजगी पिस्तुलातून ४ फायरिंग केला नसत तर कदाचित तहसीलदारांना आपला जीव गमवावा लागला असता तेवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्तव्यावर रुजू असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक याबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.
वाळू माफियांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे त्यामुळे त्यांना कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नसून तहसीलदारांसारख्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत या वाळू माफियांची मजल गेली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून अशा गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने वाळू धोरणात बदल केला असून आतापर्यंत कुठल्याही निविदा सुरू झालेल्या नसताना कायद्याला न जुमानता अरेरावी करत तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत मजल गेली आहे असेही लोणीकर यांनी सांगितले
मागच्या काही दिवसापासून नदीपात्राच्या लगतच्या नागरीकांच्या भ्रमणध्वणी वरुन तक्रारी प्राप्त होत असून रेती उत्खनन वाहतूक चोरी करणारे वाळूमाफिया नदीपात्रात जावून हायवा ट्रक, लोडर, जेसीबी, इत्यादीव्दारे रेती उत्खनन करुन तो रेती जेसीबी, हायवा ट्रकच्या माध्यमातून अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे तक्रारी आपेगांव, शहागड, हसनापुर, पाथरवाला, सिद्धेश्वर पॉईट, गोंदी या ठिकाणाहून प्राप्त झालेल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसीलदार यांनी गोपनीय गस्त घातली असता आपेगांव, शहागड या ठिकाणी नदीपात्रात हायवा ट्रक व ट्रॅक्टर आढळून आले होते. अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
नदीपात्रात कार्यवाही केली असता २० ते २५ हायवा ट्रक, लोडर आढळून आलेले होते. त्या कार्यवाही दरम्यान ६ हायवा जप्त करण्यात आले होते. शहागड येथे सुद्धा गोपणीय चौकशी दरम्यान अनेक लोकांची नावे प्राप्त झालेली असून ते दररोज २० ते २५ हायवाव्दारे रेतीची चोरी केली जाते. तसेच हसनापुर, पाथरवाला, सिद्धेश्वर पॉईट या ठिकाणी सुद्धा प्रतिबंधक रोक असूनसुद्धा अवैध रेती उत्खनन करुन चोरी व वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सदरील वाळू माफिया जाणीवपुर्वक कायदयाचा भंग करत असून जनतेमध्ये दहशत निर्माण करत आहे. हि बाब कायद्याच्या दृष्टीने गंभीर असून त्यामुळे जनतेमध्ये दहशत निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत असेही लोणीकर यावेळी म्हणाले.