गुटख्याच्या संशयावरून आयशर पकडला, मात्र निघाले ई-कॉमर्स पार्सल!
संशयावरून खोदला गुटख्याचा पहाड… सापडली ई-कॉमर्सची बिऱ्हाड..!
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा फाटा धुळे सोलापूर महामार्गावर सोमवारी सहा वाजेच्या सुमारास.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत कुचेकर यांना वरिष्ठांकडून माहिती मिळाली होती की,एक आयशर वाहन गुटखा घेऊन सूरतहून हैदराबादकडे जात आहे.या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने कसाबखेडा फाटा परिसरात कारवाई करत आयशर (MH 04 L 0356) ला अडवले.
त्यानंतर हे वाहन खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयशरचे दरवाजे उघडण्यात आले. मात्र तपासणी दरम्यान वाहनामध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे पार्सल्स भरलेले आढळले.त्यामुळे गुटख्या बाबतची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान या कारवाईच्या बातमीने परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती व नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुरुवातीला मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात होती,परंतु वस्तुस्थिती समोर आल्यानंतर ती शक्यता फोल ठरली.
