परम पूज्य साध्वीश्री विरतीप्रभाश्रीजी म.सा.आदी ठाणा-4 यांचे श्री विमलनाथ जैन मंदिरात आगमन
छत्रपति संभाजीनगर/ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्या अंतर्गत 2025 च्या चातुर्मासासाठी प. पूज्य साध्वीवर्या श्री वीरतीप्रभाश्रीजी म.सा., प. पूज्य साध्वीवर्या श्री संवरप्रभाश्रीजी म.सा., प. पूज्य साध्वीवर्या श्री सिद्धिप्रभाश्रीजी म.सा., प. पूज्य साध्वीवर्या श्री परमदृष्टिप्रभाश्रीजी म.सा. आदि ठाणा-4 यांचे शुक्रवारी सकाळी श्री विमलनाथ जैन मंदिर येथे भव्य आगमन झाले.
सकाळी 7:30 वाजता सर्व साध्वीजी भगवंता सोबत जैन मंदिर जोहरीवाडा येथून शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत प्रथम बॅन्ड, डोक्यावर कलश घेऊन त्रिशला महिला मंडल, विविध स्लोगन घेऊन चंदनबाला ग्रुप,जिनशासनचे झेंडे घेऊन विरती ग्रुप सहभागी झाल्या होत्या. विमलरत्न बॅन्ड ग्रुप ने साध्वीजी भगवंतांसमोर नवकार महामंत्र च्या धुनवर बैंड वाजविला. अशाप्रकारे जोहरीवाडा,पानदरिबा, राजाबाजार मार्गै श्री विमलनाथ जैन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली.त्यानंतर
साध्वीजी भगवंतांचे प्रवेश झाले व मांगलिक द्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. नवकार महामंत्राचे उच्चारण करून नरेंद्र गेलडा यानी सूत्र संचालन शुरू केले. संघाचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती, सेक्रेटरी रुपराज सुराणा व यावर्षी चे चातुर्मास अध्यक्ष महेंद्र जैन यांनी पुढिल चातुर्मासाची रूपरेषा सांगितली. चंदनबाला ग्रुप व योगिता सुराणा यानी स्वागत गीत गायिले व नाटक सादर केले.भजनाने सर्व भक्तगण मंत्रमुग्ध झाले.
त्यानंतर साध्वी विरतीप्रभाश्रीजी म.सा.यांचे व्याख्यान झाले त्यात त्यांनी 13 जुलैपासून 34 दिवसाचे निघोदनिवारण तप करण्याचे योजिले असल्याचे सांगितले. ज्यामधे 25 उपवास व 9 बियासने येतील. सर्व भक्तगणांनी या तपात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण ट्रस्टमंडल, सलाहकार मंडल, चातुर्मास समिति व विविध मंडले परिश्रम घेत आहेत.