पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन
जालना/प्रतिनिधी/ भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील गुरु गणेश भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महा रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चित्रप्रदर्शनी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.कैलासजी गोरंट्याल, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.
या प्रसंगी “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केवळ औपचारिकतेपुरता न राहता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करणे हीच खरी सेवा आहे, “नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, हेच समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल, भाजपाच्या कार्यपद्धतीत समाजसेवा हेच केंद्रबिंदू असून या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सेवा व सहभागाची भावना दृढ होत आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान करून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.
