छत्रपती संभाजी नगर/ गोरगरीब जनतेच्या वतीने महापालिका आयुक्तांना विनंती पूर्वक निवेदन सादर केलेले आहे. की,सदरील गुंठे वारी योजना 2020 मध्ये चे आपण मागचा वेळी 50% ची सुट दिलेली होती. ती संधी परत एकदा देण्यात यावी जेणेकरून शहरात 20× 30 चे घरात राहणाऱ्या गरीब जनतेला आपले घरे नियमित करण्यास मदत होईल.
सध्या संपूर्ण शहरात महापालिका तर्फे अतिक्रमणची कारवाई जोरात सुरू आहे अनेकांचे घरे दुकाने बिल्डिंग या अतिक्रमण विभागाने काढलेली आहे तसेच आपण आवाहन केलेल्या प्रमाणे अनेक नागरिक गुंठेवारी साठी आपल्या महानगरपालिकेत असून आपण सध्या गुंठेवारी साठी 25 टक्के सूट दिलेली असून आमची औरंगाबाद शहर सुधार संघर्ष समितीतर्फे मागणी आहे,की 50% गुंठेवारी साठी सवलत देण्यात यावी अशी आमची विनंती आहे. ही विनंतीला मान देऊन विचारपूर्वक सहानुभूती दाखवावी अशी मागणी अशरफ पठाण व त्यांच्या सहकार्याने केलेली आहेसदर अर्जा च्या सहानुभूती पूर्वक विचार करून सवलत द्यावी.अशी मांगणी अशरफ पठाण, शेख असिफ,शेख अमीर बाबा भाई, नजीम काजी, अब्दुल कय्यूम, सय्यद मोहसीन आदींने केली आहे.