Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादनवीन पाणीपुरवठा योजना गैरकारभाराची चौकशी करा आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

नवीन पाणीपुरवठा योजना गैरकारभाराची चौकशी करा आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

नवीन पाणीपुरवठा योजना गैरकारभाराची चौकशी करा

आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर– छत्रपती संभाजीनगर शहरासाठी मंजूर करण्यात आलेली नवीन पाणी पुरवठा योजनेते मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असून या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे केली आहे.

          नवीन पाणी पुरवठा योजनेच्या आर्थिक गैरकारभारासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.26) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजना सन 2019 मध्ये मंजूर करण्यात आली असून काम वेळेत पूर्ण करून शहराला आवश्यक तो पाणी पुरवठा केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र शहर वासियांना 10 ते 12 दिवसाला पाणी मिळते. परिणामी शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेत जीव्हीपीआर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. नियोजनात नसलेल्या आणि जीव्हीपीआर कंपनीशी संलग्न असलेल्या आणखीन एका दुसर्‍या कंपनीकडून कोट्यावधी रूपयांची यंत्रसामग्री, पंपिंग मशिनरी खरेदी करण्यात आली. बाजारात यापेक्षा दर्जेदार कंपन्यांची यंत्रसामग्री असताना निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी निवदेनात म्हटले आहे.

          शहरात 53 पाण्याच्या टाक्या उभ्या करायच्या होत्या त्या सदरील कंपनीकडून आजपर्यंत झालेल्या नाहीत, शहरात 1800 किलोमीटर जलवाहिन्या टाकायचे ठरले त्यातील 50 टक्के सुध्दा काम पूर्ण झालेले नाही, जायकवाडी धरणात जॅकवेल उभारणीच्या कामात हलगर्जीपणा करण्यात येत असून तांत्रिक निकष आणि गुणवत्ता धाब्यावर बसविण्यात आली आहे, जलवाहिनी टाकताना चुकीच्या पध्दतीने एअर वॉल्व बसविण्यात आले असून नवीन पाणीपुरवठा योजनेतील संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी शासनाने तातडीने चौकशी समिती नेमावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments