पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक
महोत्सवाविषयी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतली बैठक
जालना :- पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवातंर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली व एकात्म मानव दर्शन शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला इत्यादी घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी रवि जोशी, उपशिक्षणाधिकारी विनया वडजे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, समिती सदस्य तथा ॠषी विद्या स्कुलच्या व्यवस्थापकीय संचालक शितल भाला, श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयाचे कोषाध्यक्ष संजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरुवार दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्यानिमित्ताने पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवातर्गंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली व एकात्म मानवदर्शन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राम पातळीवर विविध कार्यक्रम, युवा तरूण, तरूणी विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाद- विवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. तसेच उत्कृष्ट सहभागासाठी पारितोषिक देवून गौरविण्याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. असे निर्देशही जिल्हाधिकारी मित्तल यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
