Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबाददेवगिरी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

देवगिरी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

देवगिरी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

त्रपती संभाजीनगर : देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी विज्ञान वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर प्रमुख पाहुणे म्हणून जेईई नीटचे संचालक प्रा. एन. जी. गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा.सुरेश लिपाने उपप्राचार्य प्रा.विजय नलावडे  यांची उपस्थिती होती. यावेळी पालक मेळाव्याचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डॉ.किरण पतंगे यांनी केले. पालक मेळाव्याचे संयोजक उपप्राचार्य प्रा.अरुण काटे यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थी ,पालक, शिक्षक असा ऋणानुबंध निर्माण व्हावा अशी भूमिका व्यक्त करून शिस्त, स्वच्छता, सुरक्षा, अभ्यासक्रम, आणि उपक्रम या पंचसूत्रीचे महत्व पटवून दिले. महाविद्यालयातला प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून यशाकडे कसी वाटचाल करेल यासाठी परिपूर्ण मेहनत घेत आहे याविषयी सविस्तर विवेचन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेईई नीटचे संचालक प्रा.एन.जी.गायकवाड यांनी संस्थेची आणि महाविद्यालयाच्या विकास आणि प्रगतीचे माहिती देऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःच्या पायावर कसा उभा राहील हा दृष्टिकोन ठेवून महाविद्यालयाने राबवलेले विविध कोर्सेस, योजना,JEE, NEET, MHT-CET या सेल संबंधी पालक आणि विद्यार्थ्यांना सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अशोक तेजनकर यांनी महाविद्यालयाची वैभवशाली परंपरा सांगून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देवगिरी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेले कार्य विशद केले तसेच पुढील पिढी घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे आणि अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षाचे सूक्ष्म नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन केले.पालक मेळाव्याच्या निमित्ताने ‘पालक जागरूकता शिबिराचे’ आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.यावेळी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मान्यवरांनी उत्तर दिले. पालक मेळाव्या़च्या निमित्ताने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून गीता सिताफळे, आमले भाग्यश्री यांनी मनोगत व्यक्त केली.
पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका डॉ.सीमा पाटील जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.अनघा देशपांडे प्रा.रवींद्र पागोटे पालक मेळावा समिती प्रमुख प्रा.उमाकांत कोरे, प्रा.उज्ज्वला भोसले,प्रा.शिवांगी खंदारे,प्रा.मोनाली पालोदकर, प्रा.दिपाली काठोळे, प्रा.वंदना वाघमारे, प्रा‌.सुनीता गवळी, प्रा.विद्या सूर्यवंशी, प्रा.माधव जाधव, प्रा.साईनाथ लंबाडे प्रा.बालाजी कदम प्रा.अमर कंटुले प्रा.ऋषी कुमार जाधव डॉ.राजन राजपूत प्रा. नीलिमा वाबळे, प्रा‌.आशा करंडे, प्रा. मंजुषा पवार, प्रा. सुरज सोनवणे, प्रा मशरत पठाण, प्रा.वर्षा पाटील, प्रा.सरोज पांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.मंजुषा पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments