पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्र्वर जगदाळे यांनी निर्माण केली विविधतेत एकता
पिपंळवाडी/प्रतिनिधि/ पैठण तालूक्यातील एम आय डी सी पोलीस ठाणे मध्ये यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात आला.पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्र्वर जगदाळे यांनी एक आदर्श समोर ठेवुण गुरुवार दि. 4/ सेप्टेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व जाती धर्माच्या नागरीकांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार करुन सर्वांना सन्मान दिला.शांततेत बैठका घेऊन महाप्रसादा चे आयोजन केले. सर्व धर्माच्या नागरिकांना एकत्र आणुन विविधतेत एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कार्याबद्दल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व जाती धर्माचे नागरिक त्यांची वाहवाही करत आहेत. त्यांच्या अशा समाज कार्यासाठी सर्व नागरिक सदिच्छा व्यक्त करत आहेत.