पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील स्वस्त धान्य चालकाची मनमानी कारभार 
पैठण तालुक्यातील असलेल्या बोकुड जळगांव तांडा येथील दुकान क्र.९६ येथील स्वस्त धान्य चालक मागील काही वर्षांपासून मनमानी पद्धतीने वागुन पात्र कार्ड धारकांना हक्काचा शिधा घेण्यापासून वंचीत ठेवत आहे.
तालुक्यातील बोकुड जळगाव तांडा येथील स्वस्त धान्य दुकान चालक आपल्या दुकानात अधिकृत नोंद असलेल्या कार्ड धारकांना आपल्या हक्काचा शिधा देतांना वेठीस धरत आहे.कार्डधारकांना चक्क सकाळीच धान्य घेन्यासाठी बोलाऊन सर्वर डाऊन आहे, उद्या या,धान्य संपले, आजच व आत्ताच आले पाहिजे नंतर अलात तर धान्य देणार नाही. कार्डधारकांना आल्या पावली परत पाठवत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून चालु असल्याने येथील नागरीक या दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.
चक्क पहाटेच्या वेळेस धान्य घेण्यासाठी बोलाऊन त्यांना लांबच लांब रांगा लावायला सांगतो.त्या नंतर सर्वर डाऊन आहे, उद्या या धान्य संपले आहे. आज धान्य घ्यायला आले नाहीतर उद्या मिळणार नाही. पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा शिधा घेण्यापासून वंचीत ठेवत असल्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सर्रास सुरु आहे.तसेच सदरील स्वस्त धान्य चालक प्रतेक महिन्याला नित्य नियमाने येणारे धान्य गोरगरीब कार्ड धारकांना मनमानी करून त्याच्या सोई नुसार धान्य घेन्यासाठी बोलवतो. आणि एकाच वेळी गर्दी झाली तर काही लाभार्थ्यांना धान्य वाटप करुण उर्वरीत लोकांना आज धान्य मिळणार नाही उद्या या असे म्हणून पहाटे पासून नंबर लावून बसलेल्या लोकांना आल्या पावली परत पाठविण्याचा प्रकार होत आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीच दखल घेवुण त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन या कार्ड धारकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.